साहोने केली दमदार कमाई

    दिनांक :02-Sep-2019
 
 
 
साहो हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामीळ अशा तीन विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसांत ६८ कोटीचा गल्ला जमवला होता... केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाने २४.४० कोटींचे कलेक्शन केले होते. आता तर या चित्रपटाने १०० करोडच्या क्लबमध्ये एंट्री घेतली असून या चित्रपटाने जगभरात १०४ कोटी रुपये कमावले आहेत तर हिंदी भाषेत आतापर्यंत ७९.८ कोटीचा गल्ला जमवला आहे. २०१९ मध्ये रविवारी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला असून या चित्रपटाने कबीर सिंग, मिशन मंगल, भारत या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. या चित्रपटाने केवळ रविवारी २९-३० कोटीचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची घौडदोड अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट लवकरच २०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी आशा वर्तवली जात आहे.