नाल्याच्या पुरात कार गेली वाहून

    दिनांक :02-Sep-2019
दोघे बचावले
भंडारा,
नाल्यावर असलेल्या पुलावरून दिड फूट पाणी वाहत असताना पूल पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कर वाहून गेल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास साकोली करडी मार्गावरील चांदोरी गावा जवळ घडली. गाडी वाहून जात असल्याचे पाहून चालक व गाडीतील अन्य एका युवकाने बाहेर निघून झाडाला हात पकडल्याने ते बचावले. गाडीचा समोरचा भाग यावेळी तुटून पडला असून उर्वरित गाडी मात्र वाहून गेल्याची माहिती आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली क्षेत्रातून इच्छुक असलेले ब्रम्हानंद करंजेकर यांचे हे समर्थक असल्याचे समजते.