सेवा निवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत

    दिनांक :02-Sep-2019
 
 
 
रिसोड,
देशाच्या सीमेवर आपली सेवा पूर्ण करून गावी परत आलेल्या सैनिकाचे मित्रमंडळींनी बस स्थानकावर जंगी स्वागत केले.
शहरातील पवारवाडी येथील राहुल लक्ष्मण पवार यांनी भारतीय लष्करात  22 वर्ष देशाच्या सीमेवर विविध ठिकाणी सेवा केली. दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी आपली सेवा पूर्ण करून आपल्या गावी रिसोड येथे परत आले. राहुल पवार यांच्या मित्र मंडळींनी बस स्थानकावर त्यांचे जंगी स्वागत केले . त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढली. पुढे डीजे, घोड्यावर राहुल पवार, त्यामागे शेकडो मित्र मंडळ असा हा देशभक्तीने भरलेला सोहळा बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली . शहरांमध्ये एखाद्या सेवा निवृत्त सैनिकाची मिरवणूक ही पहिल्यांदाच निघाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मिरवणुकीने राहुल पवार यांना त्यांचे घरी पोहोचवून त्याठिकाणी सर्वांना चहा फराळ देण्यात आला .