शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांला लागला शॉक

    दिनांक :20-Sep-2019
गिरड,
समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांला शाळेच्या पटांगणातच शॉक लागला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही घटना काल १८ रोजी घडली.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथे जिल्हा परिषदेच्या आजूबाजूला दोन दोन खोल्याच्या शाळा आहेत. यातील एका शाळेत इलेकटीतक मीटर असून दुसऱ्या शाळेत त्यातून लाइन घेण्यात आली. रात्रीच्या सुमारास दुसऱ्या शाळेत जाणारा वायर हवेने तुटला. काल सकाळी विद्यार्थी शाळेत आले असताना तिसऱ्या वर्गातील हिमांशू साटोने या मुलाने खाली पडलेला वायर उचलताच त्याला जोरदार झटका लागून तो खाली पडला. विद्यार्थी खाली पडल्याचे परिसरातील नागरिक आणि शिक्षकांच्या लक्षात येताच त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती कळताच जिप अध्यक्ष नितीन मडावी, शिक्षण सभापती जयश्री गफाट, शिक्षणाधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची चॉकशी केली. त्याची प्रकूती चांगली असल्याची माहिती गफाट यांनी दिली.