देशी पिस्टल प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

    दिनांक :20-Sep-2019
मंगरूळनाथ पोलिसांची कारवाई
 
मंगरूळळनाथ,
शहरातील व्हिडिओ चौकात 5 सप्टेंबर रोजी देशी पिस्टल व जिवंत कड़तूस प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई येथून 18 सप्टेंबर रोजी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील व्हिडिओ चौकात 5 सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना पकडून त्यांच्या कडून एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काड़तूस जप्त केले होते तर तिसर्‍या आरोपीला 6 सप्टेंबर रोजी अटक केली होती. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद परवेज शराफत अन्सारी रा. नालासोपारा मुंबई याला 18 रोजी मुंबई तुरुंगातून ताब्यात घेऊन 19 सप्टेंबर रोजी मंगरूळनाथ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 

 
 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अतुल तांबे,पीएसआय मंजुषा मोरे,पीएसआय सोनोने, डीबी पथकाचे संदीप खडसे, सुनील गंडाईत, अमोल मुंदे, मो.परसुवाले, सचिन शिंदे,रवी वानखेडे, अंबादास राठोड,सत्यवादी खडसे,सुवर्णा मनवर यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. सदर आरोपीवर शस्त्र अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली आहे.