पावसामुळे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघे ठार; मृतांमध्ये गरोदर महिलेलाही समावेश

    दिनांक :20-Sep-2019
 
 
 
मेहकर,
काल मध्यरात्रीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे स्थानिक इमामबाडा परिसरातील एका घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत.मृतामध्ये गरोदर महिलेसह सहा वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.
काल मध्यरात्री 1 नंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली .या पावसामध्ये इमामबाडा परिसरातील एका जुन्या घराची भिंतकोसळून शेख आसिफ शेख अशरफ वय 28 वर्ष, शाईस्ता शे.आसिफ वय 25 हे पती पत्नी व त्यांचा सहा वर्षीय मुलगा जुनेद शे.आसिफ हे एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहे.तर शे.ताहेर वय 20 वर्षं व फयजान शे.आसीफ वय 8 वर्ष हे दोघे जखमी झाले आहेत. मृत महिला सहा महिन्याची गरोदर असल्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. जखमींवर स्थानिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.