महानेटचे काम करणार्‍या इसमाला विजेचा धक्का

    दिनांक :21-Sep-2019
विद्युत खांबावरून खाली पडल्याने जखमी
वाशीम,
राज्यशासनाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने महानेट अंतर्गत काम करणे सुरू आहे. या अनुषंगाने कारंजा तालुक्यात देखील काम सुरू आहे. या कामा अंतर्गत इंटरनेट केबल विद्युत खांबांहून टाकत असतांना विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने विद्युत खांबावरून सदर इसम जखमी झाल्याची घटना पोहा बेलमंडळ मार्गावर 21 सप्टेंबर रोजी दुपारी पावने 12 वाजताच्या दरम्यान घडली.
 
 
 
शिवशंकर गजानन शेवाळे (वय 21) रा. बिटोळा भोयर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर इसम इंटरनेटचा केबल विद्युत खांबावरून टाकत असतांना त्याच्या छातीला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला. व त्याला विजेचा धक्का बसल्याने खांबावरून खाली फेकल्या गेले. यात तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला किरण राठोड रा. उमरदरी या क्रुझर चालकाने उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. बांडे यांनी त्याच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले.