पूराचे पाणी दुकानात घुसल्याने व्यवसायिकाचे नुकसान

    दिनांक :21-Sep-2019
 
 
 
मंगरुळनाथ,
तालुक्यातील शेलूबाजार येथे 20 सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरुन गुडघ्यापर्यंत पाणी वाहत होते. सदर पाणी हे अनेक दुकानात घुसल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले.
शेलूबाजार व परिसरात 20 सप्टेंबरच्या रात्री दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. जवळपास तासभर कोसळलेल्या पावसाने रस्त्यावरुन पाणी वाहत होते. पाणी वाहून नेणार्‍या नाल्या गाळाने भरल्याने सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यालगत असलेल्या खोलगट भागातील अनेक दुकानात पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा, त्यांना दुकानात गुघड्यापर्यंत पाणी साचलेले दिसले. सदर पाणी काढतांना व्यवसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.