मोकाट गाईमुळे झाला तिहेरी अपघात

    दिनांक :21-Sep-2019
 
 
 
तळेगाव, 
मोकाट वाहनामुळे तळेगाव आष्टी टी पॉईंट जवळ तीन ट्रक एका मागे एक धडकून अपघात झाला. काळ रात्री सात वाजता ही घटना घडली. तीनही ट्रक हे नागपूरकडून अमरावतीकडे जात असतांना तळेगांव उड्डाण पुलाजवळ अचानक चार मोकाट गायी रत्यावर आल्याने  ट्रक चालकाने जोरात ब्रेक लावला आणि मागून भरधाव येणारे दोन ट्रक समोरच्या ट्रकवर धडकले. या अपघातात चारही गायींचा मृत्यू झाला. तर अपघातात तीनही ट्रकचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही मानवी जीवित हानी झालेली नाही.