दुचाकीच्या अपघातात एक ठार दोन जखमी

    दिनांक :22-Sep-2019
कुरखेडा,
कुरखेडा-मालेवाडा मार्गावरील चांदोना गावाजवळ असलेल्या वळणावर दुचाकी चालकाचा संतुलन बिघडल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली
 
 
 
गौरव तुलावी असे मृतकाचे नाव आहे तर योगेश इंद्रशाह कुमरे व चरणदास सुधाकर कुमरे  अशी जखमींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार मृतक व जखमी असलेले दोन असे तिघेजण एकाच मोटारसायकल ने कुरखेडा वरून आपल्या स्वगावी चर्विदंड येथे जात असताना चांदोना गावाजवळ असलेल्या वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकी वाहनाचा धसका घेत दुचाकी चालकाचा वाहनावरील संतुलन बिघडल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला आढळल्याने दुचाकीला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.