चुकीच्या उपचारामुळे युवकाचा मृत्यू

    दिनांक :22-Sep-2019
★ संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यात घेराव.
★इंजेक्शनच्या रियाक्शनने मृत्यू झाल्याचा आरोप.
★ मृतकाचे प्रेत आणले ठाण्यात.
सिंदी (रेल्वे) ,
चुकीच्या उपचाराने नजीकच्या गणेशपूर (बोरगाव) येथील रहिवासी संदेश बंसीलाल मोहिते वय १९ वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० बाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी मृतकाचे प्रेत पोलीस ठाण्यात आणून जोपर्यत आरोपी डॉ. कोहळे यांच्यावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत प्रेत येथून उचलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामूळे काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. याप्रकरणी फिर्यादी सुभाष दामोदर मोहिते रा. गणेशपूर (बोरगाव) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
 

 
 
त्यामुळे ताबडतोब सदेशला रात्री १२ वाजताच्या दरम्यान सेवाग्राम येथील दवाखान्यात नेले. परंतु तिथेसुद्धा पेशंटची परिस्थिती पाहून तुम्ही पेशंटला इतरत्र दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सेवाग्राम येथून लगेच सावंगी येथील दवाखान्यात सदेशला नेले व भर्ती करून घेतले. तपासणी दरम्यान तेथील डॉक्टरांनी रुग्णाला दिलेल्या इंजेक्शनमुळे ऍलर्जी  झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर आय सी यु मध्ये भर्ती करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान संदेशचा २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. २२ सप्टेंबर रोजी मृतकाचे पोस्ट मार्टम करून मृतकाचे प्रेत चक्क पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात तणावपूर्ण शांतता पसरली होती. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी फिर्यादी सुभाष दामोजी मोहिते यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्युची नोंद घेऊन चौकशी करून दोषी आरोपीविरुद्ध कार्यवाही करण्याचे आस्वासन दिले. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतकाचे प्रेत ठाण्यातून उचलून नेले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वंदना सोनूने करीत आहे.