ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना उपचाराऐवजी केल्या जाते दमदाटी

    दिनांक :22-Sep-2019
कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील प्रकार
 
कारंजा लाड,
ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना आरोग्य सेवाचा लाभ घेता यावा या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. अलिकडेच काही वर्षांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा येथे स्थानांतरीत करून कामरगाव येथील रूग्णालयाला गा्रमीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला. परंतु सध्यपरिस्थितीत या गा्रमीण रूग्णालयात रूग्णांना उपचाराऐवजी उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांकडुन दमदाटीच, अधिक केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
 

 
 
शिवाय सदर ग्रामीण रूग्णालयात स्वच्छता राखण्याच्या हेतुने वार्ड बॉय व शिपायांची नियुक्ती असतांना शिवाय ते कर्तव्यावरही असतांना त्यांचेकडुन रूग्णांच्या नातेवाईकांना रिकाम्या झालेल्या सलाईनच्या बाटल्या गोळा करण्यास सांगितले जात असल्याचा घृणास्पद प्रकार देखील अलिकडेच उघडकीस आला आहे. यावरून कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. उपरोक्त प्रकाराने संतप्त नागरिकांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व वार्ड बॉय यांचेवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर ग्रामीण रूग्णालयात परिसरातील जवळपास 40 गावातील रूग्ण सेवा घेतात. परंतु, येथील कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दमदाटीमुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याने उपचारासाठी रूग्ण धजावत नसल्याचे दिसून येत आहे. आजाराचे मुळ कारण हे अस्वच्छता असल्याचे आरोग्य विभागाकडुन वारंवार सांगितल्या जाते. शिवाय आरोग्यासाठी स्वच्छता राखण्याचे आवाहनही केल्या जाते. परंतु स्वच्छतेसाठी आवाहन करणार्‍या आरोगय विभागाच्या कामरगाव गा्रमीण रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात सांडपाणीही साचले आहे. यावरून दिव्याखाली अंधार या म्हणीचा प्रत्येय येतो. घाणीमुळे सदर रूग्णालयात उपचार घेउुन आजार बरा होण्याऐवजी अधिक बळावतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.