बुलडाण्यात खळबळ; विहिरीत आढळले आईसह चार मुलींचे मृतदेह

    दिनांक :23-Sep-2019
बुलढाणा,
बुलढाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातील माळेगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह माळेगावातील एका विहिरीत आढळून आले आहेत. मृतांमध्ये आईसह ४ मुलींचा समावेश आहे. आई उज्वला ढोके, मुलगी वैष्णवी ढोके, दुर्गा ढोके, आरुषी ढोके आणि पल्लवी ढोके या १ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचेही वातावरण पसरले आहे. 

 
 
 
 गावातील विहिरीत ५ मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरा आधीच त्यांच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली होती . याच नैराश्यातून उज्वलाने आपल्या मुलींसह आत्महत्या केल्याचे सांगितल्या जात आहे. 
दरम्यान, आईसह ४ मुलींची हत्या करण्यात आली की ही आत्महत्या आहे याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. या प्रकणाचा पोलीस शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणात ढोके कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांची चौकशी करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.