ग्रमीण भागात बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ

    दिनांक :23-Sep-2019
मंगरूळनाथ,
मंगरूळनाथ तालुक्यात जवळपास 100 खेडेगावाचा मुखवटा असलेला तालुका आहे. जवळपास 60 ते 65 टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात शेतीशी जुळलेली असल्यामुळे गावखेड्यात वास्तव्याला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ही कमालीची दुर्लक्षित असून याचाच गैरफायदा काही अप्रशिक्षित व्यक्ती पैशाच्या लालसेने बोगस डॉक्टरगिरी करून भोळ्याभाबड्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.
 

 
 
 
मंगरूळनाथमध्ये मोठ्या प्रमाणात आणि उच्च पदवी घेतलेले आरोग्य चिकित्सकरांची मोठी दवाखाने आहेत. तरीही हे डॉक्टर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये चिकित्सेसाठी कमीच पडताना दिसत आहे. प्रशिक्षित आणि तज्ञ डॉक्टरांकडे एखाद महिने कंपाउंडरगिरी करणारे डॉक्टरांचा सुळसुळाट गाव खेड्यांमध्ये झालेला आहे. या प्रकाराकडे जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार मागील अनेक वर्षापासून राजरोसपणे चाललेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची मिळकत ही तुटपुंजी असल्यामुळे आणि उद्योग व्यवसायांचा अभाव असल्यामुळे पैशाची नेहमी चनचन चालूच असते. या बाबीचा गैरफायदा हे बोगस डॉक्टर नेहमी घेत असतात. अतिशय कमी पैशांमध्ये हाय डोजेस हे ग्रामीण आजारी नागरिकांच्या माथी मारत असतात. यामुळे रुग्णांना तत्कालिक आराम मिळतो. परंतु, हायड़जेस चा परिणाम शरीरावर विपरीत होत असल्याचे संबंधित पेशंटला माहीत नसते. या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारचे आरोग्यविषयक ज्ञान नसल्यामुळे बर्‍याचदा ग्रामीण भागात मध्ये जीवित हानी सुद्धा होण्याची दाट शक्यता असते.
बोगस डॉक्टर हे स्थानिक त्याच गावाचे निवासी असल्याने ना हाक ना बोंब अशी परिस्थिती नेहमी उद्भवत असते. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची आणि जीविताशी खेळणार्‍या या बोगस डॉक्टरांवर चाप बसवण्यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी जोगलदरी, सावरगाव, दाभा, कोळंबी आणि बर्‍याच गावांमधून तीव्रतेने होत आहे.