चिमुकल्यासह मातेने घेतली विहिरीत उडी

    दिनांक :23-Sep-2019
ग्रामस्थांनी मातेला वाचविले पण चिमुकल्या चा मृत्यू
 
आर्वी,
16 महिन्याच्या चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी दोघांनाही बाहेर काढले पण यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना आर्वी तालुक्यातील सावळापूर येथे रविवारी 12 वाजताच्या दरम्यान घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रिया शैलेश निंबाळकर असे वाचविण्यात आलेल्या महिलांचे नाव आहे तर संघर्ष शैलेश निंबाळकर असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. हे दोघेही  सावळापूर येथील रहिवाशी आहेत. संघर्ष अवघ्या १६ महिन्यांचा होता.  
मिळालेल्या माहितीनुसार प्रिया हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी शैलेश उकंडराव निंबाळकर यांच्याशी झाला शैलेश इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतो घटनेच्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता घरी आल्यानंतर जेवण करून तो आई वडील भाऊ झोपी गेले.

 
 
२६ वर्षीय प्रिया  ही थोडी वेडसर असून दररोज रात्री ती या लहान मुलांला घेऊन फिरायला जायची रविवारी रात्री बाराच्या दरम्यान प्रिया संघर्ष ला घेऊन फिरत असतानाच माणिकराव सोमकुवर यांचे तिच्याकडे लक्ष गेले दरम्यान तिने ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळ येऊन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली माणिकराव सोमकुंवर यांनी आरडाओरड केली असता मधुकर सोमकुवर शैलेश निंबाळकर व अनेक ग्रामस्थ धावत आले त्यांनी लगेच उडी घेऊन दोघांनाही बाहेर काढले त्वरित त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे संगितले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून त्यांचे बयान घेतले आहे. चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांचे ताब्यात देण्यात आला. या नंतर  त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निंबाळकर कुटुंब हे सभ्य शातताप्रिय कुटुंब आहे यामुळे या घटनेने हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.