विवाहितेवर अत्याचार करून पतीला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड

    दिनांक :23-Sep-2019

 
 
 
मंगरुळनाथ
२३ वर्षीय विवाहीत महीलेवर अत्याचार करून तिच्या पतीवर तलवारीने वार केल्याप्रकरणी पोलिसांनी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील दिवानपुरा येथील एका २३ वर्षीय विवाहीत महिलेने तक्रार दिली की, २२ तारखेच्या रात्री आरोपी जावेदखान जायदखान वय २७ रा दिवानपुरा हा पीडित महिलेलच्या घरी आला  व महिलेवर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करताच तिचा पती तलवार घेऊन आला.आरोपीने महिलेच्या पतीच्या हातून तलवार हिसकली व पीडितेच्या पतीस ठार मारण्याचा प्रयत्न केला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीस अटक करून ता २३ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण,एसडीपीओ यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे यांचे मार्गदर्शनात पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.