जिवंत काडतुसे व देशी कट्टयासह आरोपीस अटक

    दिनांक :24-Sep-2019
 
 
 
मेहकर,
जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचा कट्टा घेऊन विक्रीसाठी मोटारसायकल वरुन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्था.गु.शाखेच्या पथकाने एकास अटक केल्याची घटना नायगांंव दत्तापुर ता.मेहकर नजिक २३ रोजी सायंकाळी ६वाजे दरम्यान घडली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनंतर जि.पो.अधिक्षक भुजबळ, अप्पर जि.पो.अधिक्षक डॉ. संदीप पखाले,स्था.गु.शाखेचे पो.नि.महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पी. आर. इंगळे, पो.हे. का. श्रीकृष्ण चांदुरकर, पो.हे.का.शेख साजिद,पो.का. संदीप मोरे, पो. का. विजय सोनुने, चालक भारतसिंग राजपूत यांच्या पथकाने जानेफळ नायगाव दत्तापूर दरम्यान नाकाबंदी करीत मिळालेल्या वर्णनाच्या आधारानुसार पिवळ्या रंगाची पगडी बांधून आरोपी सतनामसिंग प्रतापसिंग बावरी वय ३०वर्ष हा भरधाव वेगात मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८ एस ५३३७ वरुण येत असतांंना त्यास नायगांंव दत्तापुुुर नजिक पुुुलाजवळ सापडा रचून ताब्यात घेेतले असता त्याचा जवळ १ देशी बनावटीचा कट्टा,४जिवंंत काडतुसे व १ मॅक्झिन मिळुन आल्यानेे याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,सहकलम१३५ म.पो.का.नुुुसार कार्यवाही करीत आरोपीस अटक करून जानेफळ पोलीसांंच्या ताब्यात देेेण्यात आले आहेे. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूकच्या तोंंडावर सदर देशी कट्टा,पिस्टल व जिवंत काडतुसे स्था.गु.शाखेच्या पथकाने जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.