गावठी दारू अडड्यावर पोलिसांचे छापे!

    दिनांक :24-Sep-2019
रिसोड, 
शहरातील माणुसकी नगर रिसोड़ येथील दोन गावठी दारू अडड्यावर छापा मारून एकूण 47 हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. 

 
 
रिसोड शहरातील माणुसकी नगर येथे अवैध दारू विक्री जोरात चालू असल्याची माहिती एलसीबी च्या पथकाला मिळाली त्या माहितीच्या आधारे रिसोड़ येथे छापा मारला असता आरोपी संजय शेषराव पवार रा. माणुसकी नगर रिसोड यांच्या कडून 25 लिटर गावठी दारू व 160 लिटर सड़वा असा एकूण 21 हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला.
 
 
तसेच आरोपी दिलीप मधुकर पवार, रा. माणुसकी नगर रिसोड याच्या घरी छापा मारला असता याच्या कडून 20 लिटर गावठी भट्टी दारू 220 लिटर सडवा असा एकुण 26 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी कडून एकुण 47 हजार रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध 19 कलम 65 ईफ कायद्यानुसार पोलिस स्टेशन रिसोड़ येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकॉ कंकाळ, नापोकॉ भगत, नापोकॉ सुनील पवार, पोकॉ राजू राठोड, पोकॉ पूजा, थोरवे, नापोकॉ आडे, पोकॉ गिरी, पोकॉ राम नागुलकर, पोकॉ किशोर यांनी केली.