नागपुर वरून अमरावतीकडे गुरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

    दिनांक :24-Sep-2019
 

 
अमरावती,
कारंजावरून अमरावतीकडे गुरे घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाचा राजनी पेट्रोल पंपाच्या वळणावर अपघात झाला. वाहनाचा समोरील टायर फुटल्याने वाहन विरुद्ध रोडवर वाहन पलटी झाले. त्याठिकाणी पाच बैल आढळून आले मात्र अजून चार शिंगे पडलेली होती तरी इतर बैलांबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही. अपघातानंतर चालक फरार झाला असून  वृत्त लिहीपर्यंत चालकावर गुन्हा नोंदविला नव्हता.