शिर्ला-चिखलगाव वळणावर कारला अपघात, दोन जखमी

    दिनांक :24-Sep-2019
 
 
 
पातुर,
अकोला-वाशिम महामार्गावर शिर्ला-चिखलगांव अपघात प्रवण वळणावर सकाळी सात वाजता कार-ट्रकमध्ये अपघात झाला.अपघातातात जखमी झालेल्या दोघांना अकोला सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे भोसरी येथून अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे नातेवाईकांकडे तेरवी साठी निघालेल्या राजेश्वर वानखडे,चंदा वानखडे यांच्या कारला अकोल्याहून पातूरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने शिर्ला-चिखलगाच्या अपघात प्रवण वळणावर जोरदार धडक दिली
अपघातात चालक सुरेश पुंडलिक काळे ,चंदा वानखडे यांना मार लागला.जखमींना सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.