अनैतिक संबंधातून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न

    दिनांक :25-Sep-2019
मंगरुळनाथ, 
तालुक्यातील उमरी बु.येथे अनैतिक सबंधातून पती अडसर येत आहे, म्हणून प्रियकरासोबत संगनमत करून पतीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरुन आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराविरुध्द आज गुन्हा दाखल करुन एका जणास अटक केली आहे.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी बु. येथील 35 वर्षीय फिर्यादीने पुरवणी जवाब दिला की, त्यांच्या पत्नीचे आरोपी संदीप सदाशिव राऊत (वय 21) रा.उमरी बु. याचे सोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधामध्ये फिर्यादी अडसर येत असल्याने दोघांनी संगनमत करून 13 सप्टेंबरच्या रात्री 10.30 वाजता फिर्यादीचे घरात त्याच्या लोखंडी बाजेला विद्युत करंट लावून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तो मरण न पावल्याने त्यास लोखंडी पाईप व गजाने डोक्यात गंभीर मारहाण केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फिर्यादीची पत्नी व उपरोक्त तिच्या प्रियकराविरुध्द दाखल केला असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
या प्रकरणात आधी अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 24 सप्टेंबर रोजी कलम 307 वाढवण्यात आले. तसेच आरोपी संदिप यास अटक करण्यात आली असून, महिलेस अटक करण्याची प्रकिया सुरु होती.