माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

    दिनांक :26-Sep-2019
- वर्धा जिल्ह्यातील नागपुर-चंद्रपुर मार्गावरील कांढळी जवळील घटना
- ताफ्यातील वाहन मागून कंटेनरला धडकले
- २ ठार तर ३ जखमी
- जखमींना त्वरीत नागपुर येथे उपचारासाठी हलविले
 
 
गिरड/समुद्रपुर,
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे आपाल्या ताफ्यासह चंद्रपूरहून नागपूरला जात असताना नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी परीसरात त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात झाल्याने यात २ जण ठार तर चार जवानांसह वाहन चालक विनोद झाळे जखमी झाले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे आपल्या ताफ्यासह चंद्रपूरवरुन नागपूरकडे जात असताना सकाळी ९.३०च्या सुमारास कांढळी परीसरात हा अपघात घडला.
 
 
 
 
अहिर यांचे वाहन पुढे जाताच त्याच्या मागे असलेले CRPF च्या वाहना मागे नागपुरकडे जात असलेला कंटेनर आला. CRPF च्या वाहनाला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक मारले असता त्यामागून येणाऱ्या CRPF वाहनाने कंटेनरला धडक दिली. या अपघातात वाहन चालक विनोद झाळे गंभीर जखमी असून अधिक तीन सुरक्षारक्षक जखमी झालेत.
 

 
 
अहिर यांचे वाहन समोर निघून गेल्याने ते थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात रवाना केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ भाजपा पदाधिका-यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. उपचारा दरम्यान चालक विनोद झाडे व जवान फलजियाई पटेल याचा मुत्यू झाला तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.