विधानसभा निवडणूकीच्या नामनिर्देशनाला सुरुवात

    दिनांक :27-Sep-2019
पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांकरीता 116 नामनिर्देशनपत्राची उचल
भंडारा,
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना आज 27 सप्टेंबरला प्रसिध्द करण्यात आली असून आज शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र वितरित करुन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आज पहिल्या दिवशी तुमसर, भंडारा, साकोली, विधानसभा क्षेत्रात 48 उमेदवारांकरीता 116 नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आले आहे. यामध्ये तुमसर 12 उमेदवार 42 नामनिर्देशनपत्र, भंडारा 26 उमेदवार 60 नामनिर्देशनपत्र तर साकोली 10 उमेदवार 14 नामनिर्देशनपत्र यांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी 116 नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आली तर एकही उमेदवारांचा नामनिर्देशनपत्र दाखल झालेला नाही. 27 सप्टेंबर पासून तर 4 ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारणे व दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.