अडाण धरणात ७० टक्के पाणीसाठा

    दिनांक :27-Sep-2019
दोन दिवसांच्या पावसाने १० पटीने वाढ
कारंजा लाड,
कारंजा तालुक्यासह परिसरात बुधवार व गुरुवारला आलेल्या जोरदार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण धरण्याच्या पाणी पातळीत १० पटीने वाढ होऊन आज रोजी ७०.३० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे आता पाणी टंचाईचा प्रश्‍न उदभवणार नाही. मात्र खरीप हंगामातील पिकाचे काही प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
 
 
 
कारंजा तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या अडान प्रकल्पात गेल्या आठ दिवसा आगोदर पाणीसाठा हा फक्त ७ टक्के होता. त्यामुळे कांरजा शहरावर पाणी संकट येईल यावर राजकीय नेत्यांमध्ये चागलीच रंगली होती. कारण कारंजा शहरासाठी पाणी आरक्षित ठेवावे, अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती. मात्र दोन दिवसांच्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने कारंजा कांरजा तालुक्यातील अडान प्रकल्प, उंद्री प्रकल्प, मोहगव्हान प्रकल्प, बग्गी प्रकल्प यांच्या सह असणार्‍या प्रकल्पात ७० टक्क्यानी पातळी ओलांडली आहे. येत्या दोन दिवसात पाउस झाल्यास तालुक्यातील सर्व प्रकल्प १०० टक्के  भरतील असा अदांज व्यक्त केल्या जात आहे.