असे सोडवा तुमचे सोशल मीडियाचे व्यसन!

    दिनांक :27-Sep-2019
आपल्यापैकी अनेकजण दिवसातून आपल्या महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ हा बहुतांश सोशल मीडियासाठी देत असतो. या जगात ‘फिलिपाईन्स’ या देशातील लोक सर्वात जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतीत करत असतात. पण यामागे वैज्ञानिक कारण असून एखादी पोस्ट आवडली म्हणून तुम्ही लाईक, कमेंट करता पण हे सर्व कशामुळे घडते याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 
 
 
दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो. नोटिफिकेशन आले की तुम्ही ते लगेच काय आहे, या उत्सुकतेपोटी उघडून पाहतो. मेंदुतील रिवॉर्डिंग सेंटर फेसबुक-ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे अॅक्टिवेट होते. जगभरात प्रत्येक युझर सरासरी 135 मिनिटे म्हणजेच जवळपास सव्वा दोन तास सोशल मीडियावर घालवतो. याचाच अर्थ लोकांचा दिवसातील 10 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्ची पडतो.
 
 
आनंदाची भावना मेंदूमध्ये असलेल्या डोपामाईनमुळे निर्माण होते. त्याचा यावर जबरदस्त प्रभाव पडतो. दारू आणि सिगारेटच्या व्यसनापेक्षा ट्विट करण्याचे व्यसनसुद्धा यातून निर्माण होते. महिलांमध्ये हे व्यसन 60 टक्के तर पुरुषांमध्ये 56 टक्के एवढे आहे.
 
 
68 लोकांचा एखादी पोस्ट शेअर करण्यामागे उद्देश ती माहिती इतरांना पोहोचवणे असा असतो तर 78 टक्के लोक यासाठी शेअर करतात की इतरांसोबत कनेक्ट राहता यावे. तर काहीजण सोशल मीडियावर असलेले नाते टिकवण्यासाठी लाईक आणि शेअर केले जाते.
 
 
या संदर्भात सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात सोशल मीडियामुळे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे 50 टक्के युजर्सनी म्हटले. मित्रांशी ऑनलाईन तुलना केल्याने प्रतिष्ठेला ठेच लागते, असे मत युजर्सनी व्यक्त केले. तुम्हाला जर सोशल मीडियाचे हे व्यसन सोडवायचे असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे. काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला टेन्शन येते त्याला अनफॉलो करा. तसेच सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहणेसुद्धा चांगले असते.