फ्लूला दूर ठेवायचं तर...

    दिनांक :27-Sep-2019
कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. पण बदलत्या वातावरणात फ्लू होण्याची शक्यता सर्वाधिक असते. लवकरच थंडी सुरू होणार आहे. या दिवसात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असलेला फ्लू म्हणजे इंफ्लूएंझा हा आजार होतो. फ्लूला दूर ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी... 
 
  • फ्लूच्या विषाणूला दूर ठेवायचं असेल तर दर वर्षी फ्लूची लस टोचून घ्यायला हवी, असं द सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचं म्हणणं आहे. फ्लूचे वेगवेगळे विषाणू आहेत पण फ्लूच्या लसीमुळे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या विषाणूंपासून संरक्षण मिळतं. सहा महिने आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी फ्लूची लस टोचून घ्यायला हवी.
  • योग्य स्वच्छता राखली तर फ्लूच्या विषाणूचा फैलाव रोखता येतो. खोकताना तसंच शिंकताना तोंडावर रूमाल धारायला हवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायला हवेत. डोळे, नाक आणि तोंडाला घाणेरडे हात लावू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
  • आजारी माणसांपासून लांब राहा. फ्लूची लक्षणं दिसली तर घरी आराम करा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. शक्यतो एकाच ठिकाणी रहा. यामुळे फ्लूचे विषाणू फैलावणार नाहीत.
  • पाच वर्षांखालची मुलं, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया यांना फ्लूच्या विषाणूची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. फ्लू गंभीर रूप धारण करू शकतो. रूग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या घटकांकडे विशेष लक्ष द्या. अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, मेंदूशी संबंधित विकार, यकृत, किडनीशी संंबंधित विकार असलेल्या लोकांनीही फ्लू होऊ नये याबाबत काळजी घ्यायला हवी.