मंगरुळनाथ पोलिसांनी केली ३ लाख ९० हजारांची रोख जप्त

    दिनांक :27-Sep-2019
मंगरुळनाथ
पोलिसांनी ता २७ चे सायंकाळी फेट्रा फाटा येथील चेक पोस्ट वर ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.निवडणूक काळात सदर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
 

 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील फेट्रा फाट्यावर ता २७ चे सायंकाळी साडे सहा वाजताचे दरम्यान तेथील चेक पोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना वाहन क्र एम एच २७ बी ई १७८८ या बोलेरो वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ३ लाख ९० हजार रुपये रोख आढळली.वाहन धारकास विचारणा केली असता सदर रक्कम ही मजुरांच्या मजुरीची असल्याची माहिती वाहन धारक शहा यांनी सांगितली. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदर ची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनोद दिघोरे,एपीआय अतुल तांबे,अंबादास राठोड, मिलिंद भगत,सचिन शिंदे,अतुल मनवर,खुशाल गाडे,चरण चव्हाण यांनी केली आहे.