शेतातील मजुरांवर मधमाश्यांचा हल्ला;१० मजूर जखमी

    दिनांक :29-Sep-2019
मधमाश्यांनी केला गावापर्यंत पाठलाग
 
पातुर, 
तालुक्यातील चतारी येथे शेतशिवारात शेत मजूरावर मधमाशांनी हल्ला केला. रविवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मधमाश्यांच्या या हल्ल्यात महीलासह एकूण १० मजूर जखमी असून, एक महिला व दोन पुरुष असे तिघे गंभीर जखमी आहेत. मधमाश्यांनी या मजुरांचा गावापर्यंत पाठलाग केला.
 
 
 
सुकळी येथील मजूर चतारीच्या गणेश रामभाऊ ढोरे यांच्या शेतात काम करण्यासाठी पोहचले होते. शेतातील झाडाखाली जेवण
करण्यासाठी बसले असता, लगतच्या शेतात कपाशीवर फवारणी सुरू होती. फवारणीचा धूर लागताच झाडाखाली जेवणासाठी बसलेल्या महिलांसह मजुरावर मधमाशांनी हल्ला चढवला घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरडा करून चतारी गावाकडे धाव घेतली. चतारी येथील गावकऱ्यांनी मदत करीत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले, यातील काही जखमींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली,५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या मजुरांमध्ये गोपाल वासुदेव अंबोरे, सुखदेव भिसे, चित्राबाई जयराम अंबोरे, हे तीन मजूर गंभीर जखमी असून, लिलाबाई वासुदेव अंबोरे, हरिष वासुदेव अंबोरे, सागर बबन वानखडे, रानी बबन वानखडे, अनिता बबन वानखडे, संदीप जाधव यांच्यासह इतर एक असे सात जण जखमी झाले आहे. यापैकी ५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. उर्वरित जखमींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली आहे.
मधमाशांनी केला गावापर्यंत पाठलाग
मधमाशांनी शेतात मजुरावर हल्ला तर केलाच पण मजुरांनी स्वतःला वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेतली असता, मधमाशांनी मजुरांचा गावापर्यंत पाठलाग करून हल्ला केला. त्यामुळे मजुरांची एकच तारांबळ उडाली होती.