अमरावतीत पाच देशी काट्यांसह चार जण पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :29-Sep-2019
 
 
 
अमरावती, 
परप्रांतातून अवैधरित्या देशी पिस्तुल आणून अमरावती शहरात विकण्याचा प्रयत्न करणार्‍या चार आरोपींना शनिवारी अमरावती पोलिसांनी रंगेहात अटक केली. जप्त केलेल्या एकूण पिस्तुलांची संख्या पाच आहे.
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड घालून ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्चभूमिवर गुन्हे शाखेचे दोन पथक नागपूरी गेट व गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान त्यांना देशी कट्टा विकणारे काही युवक फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. दोन्ही पथकांनी लगेच घटनास्थळावर जावून पिस्तुलांसह आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जिवंत काडतूस सुद्धा जप्त करण्यात आले. रहेमान खान नामक पठाणपुर्‍यातील 19 वर्षीय युवकाला पकडण्यात आले. त्यानंतर जाकीर कॉलनीतील शोएब परवेज अ.जमिल हा 30 वर्षीय युवक, गुलिस्ता नगरातील 30 वर्षीय मो.इस्ताक मो.युनुस व छाया नगरातील 32 वर्षीय असलम उर्फ बिन्नी मो.सलिम यांना पोलिसांनी वेगवेगळ्या दोन ठिकाणांहून अटक केली. पोलिस आयुक्त संजय बावीस्कर, उपायुक्त प्रशांत होळकर, शशिकांत सातव, यशवंत सोेळंके, सहाय्यक पोलिस आयुक्त डाखोरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राम गिते, विकास रायबोले, जावेद अहमद, अजय मिश्रा, दिनेश नांदे, मोहम्मद सुल्तान, निवृत्ती काकडे आदींनी ही कारवाई केली.