प्राचीन काश्मीर प्रांताचा अज्ञात इतिहास

    दिनांक :03-Sep-2019
• डॉ. अशोक नेने
 
कल्हणचा समकालीन कवी म्हणजे राजा हर्ष याचा राजकवी बिल्हण, याने रचलेल्या ‘विक्रमदेवचरित्र’ या काव्यात राज्याची राजधानी खोनोमुशाचे (आजचे खोन्मोह गाव) वर्णन दिले आहे. ‘रत्नावली’चा नाटककार हर्ष म्हणतो की काश्मिरचे केशर रंग व चवीत जगात अद्वितिय आहे. 

 
 
सांस्कृतिक इतिहास : सहाव्या शतकापर्यंत संस्कृत ही काश्मीर प्रदेशातील मुख्य भाषा होती. त्यातूनच पुढे काश्मिरी भाषेचा उगम झाला. अनेक संस्कृत ग्रंथकारांचे आश्रय स्थान म्हणजे काश्मीर. पतंजलि योगशास्त्र, अभिनव गुप्ताचे नाट्यशास्त्र, वाग्भटाचे अष्टांगऋदय किंवा पाणिनीचे व्याकरणशात्र आदि ग्रंथांची रचना इथेच झाली. वितस्ता(झेलम) नदीवर अनेक ग्रंथ आहेत त्यातील एक प्रसिध्द ग्रंथ विताशा महात्म्य. यात नदीच्या काठावरची तिर्थक्षेत्रे, आख्यायिका, धार्मिक विधी इत्यादिचे वर्णन किंवा काश्मिरचे तत्कालीन लोकजीवन आढळते.
 
नीलमत पुराणात एकुण 57 काश्मिरी व्रत वैक्ल्‌यांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी जी अनेक व्रते िंकवा उत्सव भारतभर साजरे केले जातात त्यांचे सक्षिप्त वर्णन खालिल प्रमाणे;
 
पितृपक्ष (भाद्रपद कृष्णपक्ष), पार्वती पुजन (भाद्रपद शुक्ल त्रयोदशी), गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी),जमाष्टमी (भाद्रपद कृष्ण अष्टमी), बुद्ध जयंती (वैशाख पोर्णिमा), अक्षय तृतिया (वैशाख शुक्ल तृतिया), वास्तुपुजन (चैत्र शुध्द एकादशी), शिवरात्री (फाल्गुन शुद्ध चतुर्दशी), माघी पौर्णिमा, मकर संक्राती.
 
काश्मिरची राज्य भाषा काश्मिरी (कोशूर) असून तीला स्वतंत्र लिपी (शारदा) आहे, पण तीला नगण्य स्थान देऊन तेथे उर्दुचाच प्रभाव आहे. काश्मिरचे भावनात्मक एकीकरण होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला काही उपाय करावे लागतील
 
केंद्र सरकारच्या कक्षेत येणारे उपाय :
  • राज्यातील सर्व फलक उर्दू सोबतच देवनागरी व काश्मिरी भाषेत असावेत.
  • राज्यात 1 आयआयटी व 5 ते 10 तंत्रनिकेतने स्थापन करणे.
  • नर्मदा परिक्रमा प्रमाणेच झेलम परिक्रमेसाठी व्यवथा करणे.
  • सर्व राज्याच्या सदनिकेसाठी जागा उपलब्ध करणे जेणे करून त्या-त्या राज्यातून येणार्‍याने प्रवासी लोकांची माफक दरात भोजन व विश्रामाची सोय होईल.
राज्य सरकारच्या कक्षेत येणारे उपाय:
  • सरकारी कर्मचार्‍यांसाठी 5 वर्षातून एकदा सहकुटुंब काश्मिर सहलीसाठी प्रवास भत्ता.
  • राज्यातील सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महविद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्तजागा निर्माण करणे.
  • काश्मिरी हस्तकलांना प्रोत्साहन देणे.
  • काश्मिरात 3 ठीकाणी महाराष्ट्र सदन बांधणे.
  • काश्मिरी पंडितांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथांचे जतन करणे.
  • महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी काश्मिरी ग्रामांची व शिकाराची प्रतिकृती उभारणे.
या नव्या परिचयानंतर चला जाउ या काश्मिरला, केवळ एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून नव्हे तर आपल्या प्राचीन सांस्कृतीक वैभवाच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी! (समाप्त)
9404082547