संत गजानन महाराज संसस्थानच्या पुढाकाराने सौर उर्जचा प्रसार होणार गतीमान

    दिनांक :03-Sep-2019
ना चंन्द्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन 
 
शेगांव,
संत गजानन महाराज संस्थान शेगांव यांनी पूढाकार घेऊन आपल्या 11ठिकाणी सौर उर्जचे उपकरण लाऊन त्यामधून निर्माण होणारी विज वापरायला सुरवात केली आहे या उपक्रमामुळे संत गजानन महाराजाच्या दर्शनाला येणा-या लाखो भाविकांना त्यामुळे सौर उर्जा वापरण्याची प्रेरणा मिळणार आहे त्यामुळे सौर उर्जा प्रचार प्रसाराला गती मिळणार असल्याचे महाराष्ट्राचे उर्जामंत्री ना चंन्द्रशेखरजी बावनकुळे यांनी म्हटलं आहे
संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विहार भक्त निवासातील परीसरात आयोजीत सौर उर्जा प्रठल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात मा मंत्री महोदय उद्घाटक म्हणून बोलत होते
 
 
 
ते म्हणाले की संत गजानन महाराज संस्थान हे नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवत आले आहे विदर्भातील या संस्थानबद्दल आम्हाला अभिमान आहे संस्थाननी स्वत:सौर उर्जच्या प्रकल्पाची मागणी करुन एक नवा आदर्श निर्माण केला त्यामुळे सर्वच भक्तांनी त्यांचा आदर्श घेऊन सौरऊर्जा वापरायला पाहीजे कारण कोळश्या पासुन निर्माण केलेली विज हि 7रु प्रती युनीट इतकि महाग पडते तर सौरऊर्जा पासुन तयार झालेली विज हि 2.63रु इतकि स्वस्त पडते सतत निसर्गाचा समतोल बिग्घडत असुन तो समतोल कायम राखण्या साठी निसर्गाने दिलेले स्त्रोत जास्तीत जास्त वापरणे अवश्यक आहे हवा पाणी आणी सर्य प्रकाश याचे योग्य नियोजन करून वापर करावा यासाठी मा पंतप्रधान मोदिजींनी देशात सौ उर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर सबसिडि दिली आहे त्यात राज्यसरकार सुद्धा भर घालून अधीक सहकार्य करत आहे त्याचा योग्य उपयोग करत संत गजानन महाराज संस्थान ने सौरऊर्जा वापरायला सुरवात केली आहे त्यांनी सौर कूकिंग सेंटर सुरू करावे ते पुर्ण अनुदानीत करुन देऊ असेही श्री बावनकुळे म्हणाले
यावेळी मंचावर बुलढाणा जिल्हा पालकमंत्री ना डाँ संजय कुटे खा प्रतापराव जाधव आ संजय रायमुलकर आ अँड आकाश फुंडकर संस्थानचे विश्वस्थ निळकंठदादा पाटिल पंकज शितुत जिप अध्यक्षा उमा तायडे नगरध्यक्षा सौ शकुंतला बुच विठ्ठल पाटिल अनिल डोये पुरूषोत्तम जाधव इत्यादि सह मान्यवर उपस्थित होते
शेगांव चे संस्थान दिशादर्शक ना कुटे
संत गजानन महाराज संस्थान हे भक्तांना योग्य दिशा देणारे संस्थाध असुन सौर उर्जचा प्रकल्प पाहण्यास ठी आणी उपयोगात आणण्यासाठी संस्थानचा प्रकल्प भक्तांना दिशा देईल त्यामु प्रचार प्रसार सोपा होईल हा प्रकल्प आणी ईतर मोठे बरेच रेंगाळलेले काम मा ना बावनकुळे साहेबांनी बुलढाणाजिल्हयात मार्गि लावल्या बद्दल त्यानी उर्जा मौत्र्यांचे आभार मानले बुलढाणा जिल्हयातील शेतक-यांना सौरऊर्जा द्वारे 24तास विज मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली तसेच जिल्हानियोजन समीती मधे असा निर्णय घेतला कि जिल्हयातील सर्वच शासकीय ईमारती सौर उर्जवर करण्यात येतील असेही कुटे म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक महाउर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप यांनी केले ते म्हणाले की पुरुत्तम जाधव या संत गजानन महाराजाच्या निस्सिम भक्ताने रेकाँर्ड ब्रेक वेळेत हे यूनिट उभारुन दिले ह्या प्रोजेक्ट मधे वापरण्यात येणा-या इन्वहर्टरची वारंटि 12वर्ष देण्यात आली तसेच 25वर्ष मेन्टन्स देण्यात येणार आहे हा प्रकल्प 11कोटिंचा असुन यात सबसिडि 5कोटी 45लाख देण्यात आली यामधे केन्द्रसरकार महाराष्ट्र सरकार आणि संत गजानन महाराज संस्थान शेगांव नी मदत केली यावेळी आभार सचिन भगत यांनी मानले यावेळी मोठ्या संखेने नागरीक भक्त विद्युत म़डळाचे कर्मचारी उपस्थित होते.