सत्संग सोहळ्याच्या निमित्याने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

    दिनांक :03-Sep-2019
307 रक्तदात्यांच्या विक्रमी उच्चांकासहीत संत निरंकारी भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा संपन्न
 
चिखली,
संत निरंकरी मंडळ शाखा चिखलीच्या वतीने रविवार दि.1 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व भव्य सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला भव्य रक्तदान जनजागृती मोटार सायकल रॅली, संपूर्ण चिखली शहरातून जिल्हा संयोजक शालीकराम चवरे यांचे मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. रॅलीचे शहरामध्ये ठिकठिकाणी फुलांनी रांगोळी काढून व फटाके फोडून मोठया जल्लोषाने स्वागत करण्यात आले. रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सेवालदांना गणवेश व त्यांच्या हातामध्ये असलेली विविध म्हणीचे फलक हे होते. रॅलीनंतर भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीराच अध्यक्षस्थानी निरंकरी मंडळाचे झोनलप्रमुख कन्हैयालाल महाराज हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.विजय कोठारी, व डॉ.संध्या कोठारी ह्या होत्या. 
 
 
 
प्रास्ताविक विचारामध्ये चवरे यांनी रक्तदानाचे फायदे व मंडळाची इत्यंभूत माहिती दिली. अ‍ॅड.कोठारी यांनी मंडळाचे स्तृत्य उपक्रम हे समाजाला प्रेरणादायी आहे असे सांगितले. सौ.श्वेताताई महाले यांनी निरंकारी मंडळ हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. तर सौ.वृषालीताई बोंद्रे यांनी सांगितले की, निरंकारी मंडळ हे व्यसनाधिनता कमी करण्याचे कार्य करीत आहे. कॅन्हय्यालाल महाराज यांनी अध्यक्षीय विचारामध्ये सांगितले की, निरंकारी मिशन हे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यात स्वच्छता अभियान, पुरग्रस्त व भुकंपग्रस्तांना मदत, रक्तदान, वृक्षारोपण यासारखे उपक्रमांचा समावेश असतो.
कार्यक्रमाचे संचालन सुभाष राजपूत, पवन फोलाने यांनी तर आभार चवरे यांनी मानले.
या रक्तदान शिबीरामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत जिल्ह्यातील सर्वांधिक 307 दात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य शासकीय रुग्णालय बुलडाणा, शासकीय रुग्णालय खामगांव व रेडक्रॉस सोसायटी जळगांव खांदेश, यांनी केले.
त्यानंतर सायंकाळी कन्हय्यालाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग सोहळा संपन्न झाला.