डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत भावनिक वळण

    दिनांक :03-Sep-2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच रामजी बाबांचा मोठा हात होता. प्रसंगी पोटाला चिमटे काढून, काटकसर करुन रामजी बाबांनी भीवाला शिकवलं, चांगली व्यक्ती म्हणून घडवलं. त्याच रामजी बाबांचं देहावसान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या आयुष्यातलं हे अत्यंत भावनिक वळण आहे.  भीवावर जीवापाड प्रेम करणारे रामजी बाबा अंतिम श्वासापर्यंत भीवाच्या प्रगतीसाठी आणि न्यायहक्कांसाठी लढले. 
 
 
 
 
रामजी बाबांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद अधिकारी यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला. रामजी बाबांच्या या अखेरच्या प्रवासासोबतच मिलिंद यांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतला प्रवास संपतोय. मालिकेच्या या आठवणींबद्दल सांगताना ते म्हणाले, मालिका लोकप्रिय होतेय, गोष्ट पुढे सरकते आहे. मालिकेतली माझी भूमिकाही संपते आहे. हे सगळंच थोडं क्लेशदायक आहेच पण कथानक, मालिका पुढे सरकण्यासाठी अपरिहार्यही आहे. माझ्या भूमिकेवर तुम्ही मनापासून प्रेम केलंत. लहानथोर प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारं अमाप प्रेम हे सगळं थक्क करणारं होतं, जबादारीची जाणीव करून देणारं होतं.