संत गजानन महाराजांच्या पुण्यतीथी निमीत्त हजारो भाविकांनी घेतले समाधीचे दर्शंन

    दिनांक :03-Sep-2019
नंदु कुळकर्णी
शेगाव,  
संत गजानन महाराजांचा आज पुण्यतीथी उत्सव त्यानिमीत्त हजारो भक्तांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले
संत गजानन महाराजांचा 109 वा पुण्यतीथी उत्सव आज दि 3/09/019 रोजी मोठ्या भक्ती भावाने आनंदाने उत्साहाने साजरा झाला आज सकाळी काकडा आरती झाली त्यानंतर उत्सवानिमीत्त सुरू असलेला गणेश याग व वरुण यागाची पुर्णाहुती झाली. यावेळी संस्थांचे कार्यकारी विश्वस्थ निळकंठदादा पाटील आणि ग म संस्थानचे विश्वस्थ उपस्थित होते ब्रह्मव्रुदांच्या मंत्रोच्चारात पवीत्र वातावरणात पुर्णाहुती झाली सकाळी ९वाजे पासुन भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सकाळी 7ते9पर्यंत श्रीचा समाधी सोहळा विषयावर हभप श्रीरामबुवा ठाकुर यांचे किर्तन झाले महाआरती झाली.
 

 
 
दुपारी 2 वा श्रीची पालखि गांव परीक्रमेसाठी निघाली गजानन महाराज मंदिर मधे श्रींच्या रजत मुखवट्याची यथासांग पुजा करण्यात आली त्यानंतर गज अश्व रथ मेणा भारदार चोपदार टाळकरी पताकाधारी यांचे सह श्रींची राजवैभवी पालखि निघाली यावेळी हजारो भक्त रस्त्याचे दुतर्फा श्रींच्या दर्शसाठी उभे होते श्रींची पालखि जुनेदत्त मंदिर मोट्यांचे महादेव मंदिर बाळापुर वेश माळीपुरा प्रगट स्थळ सितामाता मंदिर स्वामीविवेकानंद चौक भैरव चौक गुरूदेव चौक बसस्टँन्ड अग्रसेन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक लहुजी वस्ताद चौकातून परत मंदिरात दाखल झाली मंदिरात टाळकरी पावली खेळले महाआरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला संस्थानच्या वतीने भक्तांच्या दिंड्यांच्या सोईकरीता पिण्याचे शुध्द पाणी महाप्रसाद प्राथमीक आरोग्य केन्द्राची व्यवस्था केली होती तसेच नियमामधे बसणा-या दिंड्यांना भजनी साहित्य धार्मीक ग्रंथ भेट देण्यात आले तसेच भजनी साहीत्य दुरुस्ती करुन देण्यात आले उत्सवानिमीत्त श्रींच्या दर्शनासाठी आलेले भक्त त्रुप्त मनाने परत गेले.