तिवस्यातील महिलेला ‘स्क्रब टायफस’ ची बाधा

    दिनांक :03-Sep-2019
अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
 
तिवसा, 
आपल्या घरासमोरचा परिसर अस्वच्छ असेल किंवा घरात उंदरांचे व त्याप्रकारच्या प्राण्यांचे प्रमाण अधिक असेल तर त्यावर तात्काळ उपाययोजना करा, अन्यथा स्क्रब टायफसची लागण होऊ शकते. तिवसा येथील शिक्षक कॉलनीतील 60 वर्षीय महिला शोभा हिम्मत पुनसे यांना अलिकडच्या 8 दिवसापूर्वी स्क्रब टायफस या किड्याने चावा घेतल्याने त्यांच्यावर अमरावती येथे उपचार सुरू असून त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याची वेळ आली आहे.
 

 
 
स्क्रब टायफस हा कीटक उंदिर, कुत्रा, मांजर , गवत, कडू निंब यावर सतत ढगाळ वातावरण असेल तेव्हा आढळतो. दिसायला तो अगदी छोटा गोचिडासारखा, पण त्यापेक्षाही लहान असतो. तो चावल्यानंतर सिगारेटच्या चटक्याप्रमाणे शरीरावर डाग आढळतो. 48 तासानंतर पहिल्यांदा ताप, डोके आणि घुडगे खुपच दुखायला लागतात आणि यामध्ये ताप 102 ते 104 पर्यंत जात असून प्लेटलेट खुप खाली येत असल्याने रुग्णांवर तात्काळ योग्य उपचार करणे गरजेचे असते.
स्क्रब टायफास हा किडा फक्त जमिनीवर आढळतो आणि याला उडता येत नाही. लहान मुलांसाठी हा किडा अतिशय घातक आहे. त्यामुळे या विषारी किड्यापासून लहान मुलासंह नागरिकांनी सावधान राहायला पाहिजे. या किड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच घरातील उंदरांचा नायनाट करणे गरजेचे आहे. तिवसा येथील शोभा पुनसे या महिलेला या स्क्रब टायफसने चावा घेतला असून त्यांच्यावर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशा उपचारासाठी तालुका पातळीवर औषधोपचार व उपचाराची व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.