अंगाला गुंडाळून दारू वाहतूक करणारा तस्कर गजाआड

    दिनांक :30-Sep-2019
 
 
 
- समुद्रपुर पोलिसांची कारवाई
 गिरड/समुद्रपुर,
अवैध दारू वाहतूक करणारे पोलिसांना चकमा देण्याकरिता नवनवीन शक्कल लढवित असल्याचा प्रकार अगोद हिंगणघाट व नंतर समुद्रपुर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी समोर आणला होता. आज पुन्हा असच एक प्रकार वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर पोलिसांनी उघडकीस आणत, चक्क शरीराला दारुच्या बाटल्या गुंडाळून नेत असणाऱ्या दारू तस्कराला रंगेहात  पकडून त्याला गजाआड केले. अटक केलेल्या आरोपींचे नाव आशितोष ज्ञानेश्वर शेंडे वय २८ वर्ष राहणार बुटिबोरी जिल्हा नागपुर असे आहे. समुद्रपुर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जाम बस स्थानका जवळ सापळा रचून आशितोष शेंडे याची पाहणी केली असता सुरुवातीला त्याचे जवळ काहिच आढळून आले नाही तेव्हा पोलिसांनी त्याची अंगझळती घेतली असता त्याच्या शर्टाच्या खाली २४ विदेशी दारूच्या १८० मिलीच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी दारू जप्त करीत आरोपी  आशितोष शेंडे याला अटक केली. ही कारवाई समुद्रपुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा दारूबंदी पथकाचे अरविंद येणुरकर , वैभव चरडे, रवी पुरोहित व आदी पोलीस कर्मचारी यांनी केली.