भंडाऱ्यात विधानसभेसाठी भाजपा इच्छूकांचा पूर

    दिनांक :04-Sep-2019
भंडारा, 
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असलेल्या उमदेवारांच्या मुलाखती मंगळवारी (३ सप्टेंबर) घेण्यात आल्या. मुलाखतींसाठी इच्छूकांनी केलेली गर्दी पहाता भाजपात चांगलाच पूर आल्याचे दिसून येते. 

 
 
विद्यमान स्थितीत असलेली सत्ता आणि वर्तविले जाणार अंदाज पहाता इच्छूकांचा ओढा भाजपाकडे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत मुलाखती झाल्या, पण् कूणीही मुलाखत देण्याची संधी सोडली नाही. साकोली विधानसभेसाठी सर्वाधिक 24 इच्छूकांनी मुलाखती दिल्या. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड हे निरिक्षक म्हणून आले होेते. या सर्व मुलाखती त्यांनी घेतल्या. रात्री बराच काळ मुलाखती लांबल्या तरी इच्छूकांचा उत्साह मात्र तसुभरही कमी झाला नव्हता.