गौरी विसर्जनाच्या वेळी वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

    दिनांक :05-Sep-2019
हिंगणघाट,
गौरी विसर्जनाच्यावेळी वणा नदी परिसरातुन वाहून गेलेल्या दोन महिला व दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता.
सोमवार रोजी त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्य झाला.त्यानंतर एसडीआरएफ चमु व शासकीय यंत्रणा सतत शोधकार्य करीत असतांना अभय भगत या दहा वर्षीय बालकाचा चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सोइट येथे वाहून गेलेला मृतदेह मिळाला आहे.
 
 
 
शोधकार्य जारी असतांना आज पुंन्हा दिपाली भटे नामक महिलेचा मृतदेह मिळाला वरोरा तालुक्यातील वर्धा नदिपात्रामधे तुळाना घाटावर मृतदेह मिळाला. दिपाली हिचे नातेवाईक दिर संजय भटे घटनास्थली पोचले असून त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. घटनेतील  रिया भगत हिचा मृतदेह त्याचदिवशी घटनास्थळाच्या जवळच १५० मीटरवर मिळाला, तर दुसऱ्या दिवशी अभय भगत या बालकाचा मृतदेह जवळपास ७० किलोमीटर अंतरावर वरोरा तालुक्यातील सोइट येथे मिळाला. आणि आज  दिपाली भटे हिचा मृतदेह जवळपास ७० किलोमीटर अंतरावर सापडला. दिपाली हिचे मृतदेहाचे शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे करण्यात आले.
आता दुर्दैवी घटनेतील अंजना भगत(१३) हिचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती आहे.
शोधकार्य करतांना हिंगणघाट येथील पोलिस चमु व येथील सामाजिक कार्यकर्ते गोहणे, पत्रकार राजू खांडरे, नगरसेवक प्रकाश राऊत इत्यादि सहभागी आहेत.