आरेतील झाडे वाचवा; लतादीदींचे आवाहन

    दिनांक :05-Sep-2019

मुंबई,
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आरे कॉलनीतील झाडे वाचवण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे न तोडण्याचे आवाहन केले आहे.

 
आरेतील वृक्षराजी वाचवण्यासाठी कळकळीने ट्विट करताना लतादिदी लिहीतात, '२,७०० झाडांवर कुऱ्हाड चालवणे आणि इतक्या मोठ्या संख्येने पक्षी-प्राण्यांच्या प्रजातींचा नैसर्गिक अधिवास नष्ट करणे दुर्दैवी आहे. मी या निर्णयाला ठाम विरोध करते आणि सरकारला विनंती करते की त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून आरेचे जंगल वाचवावे.'
 
लता मंगेशकर यांच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी आरे कॉलनीतील झाडांबद्दल आपला खेद वक्त केला आहे. २००० साली दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील फ्लायओव्हरलाही लता मंगेशकर यांनी विरोध केला होता.