कर्जबाजारीपणामुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

    दिनांक :05-Sep-2019
 
 
 
आजणसरा ,
नजीकच्या चिंचोली शिंगरू येथे काल बुधवार 4 रोजी युवा शेतकरी रोशन दिलीप गायकवाड ( 24 ) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार , यावर्षी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली,त्यात काही शेतकऱ्यांनी बँकेचे पीक कर्ज घेऊन तर काही शेतकऱ्यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन कशीबशी शेतात पेरणी केली,परंतु सध्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पीक पिवळे येऊन वाढ खुंटल्याने शेतीला लागलेला खर्च ही निघणार नाही ,त्यामुळे सावकाराचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे व वर्षभर कसे जगायचे याच विवंचनेत चिंचोली शिंगरु येथील युवा शेतकरी रोशन गायकवाड यांनी घरा शेजारी असलेल्या विहरीत रात्री 9:30 वाजता उडी घेऊन आत्महत्या केली,रोशन अविवाहित असून अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांचे कडे 4 एकर शेती आहे,त्यांनी हिंगणघाट चे युनियन बँक ऑफ इंडिया कडून 2018 ला 1 लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते परंतु ते कर्ज थकल्यामुळे त्यांना यावर्षी कर्ज मिळू शकत नव्हते ,त्यामुळे सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन शेतात पेरणी केली होती, परंतु अती पावसामुळे पीक हातचे जात असल्याचे दिसत असल्याने त्यांनी आत्महत्या केली, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षापूर्वी रोशनच्या वडिलांनी सुद्धा कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या केली होती, तेव्हा पासुन त्याची आई संगीता यांनी मोल मजूरी करुण रोशनला लाहन्याचे मोठे केले परंतु आज त्याच्या आईचा एकुलता एक आधार हरपला आहे, रोशनने विहिरीत उडी घेतल्याने लक्षात येतात शेजाऱ्यांनी धाव घेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु विहीर भरून असल्याने नाका तोंडात पाणी भरल्याने प्रकृती गंभीर झाली होती, उपचारासाठी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आज शव विच्छेदन करून अत्यसंस्कर करण्यात आले.
रोशनच्या जान्याने चिंचोली शिंगरू गावात सर्वत्र हळहळ केल्या जात आहे.