आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधनवाढिची "आशा"

    दिनांक :06-Sep-2019
- मानधन न वाढल्यास कामावर बहिष्कार.
 
बादल बेले
राजुरा-  
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गतप्रवर्तक कर्मचारी संघटना ( आयटक ) क्रुती समितीच्या वतीने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड.संजय धोटे यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन आशा स्वयंसेवीकांच्या मानधनवाढीचा शाशकिय निर्णय होण्याच्या द्रुष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न करने आवश्यक असून महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय न झाल्यास चिंताग्रस्त आशा वर्कर व गटप्रवर्तक कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या अडीच हजार रुपये सरासरी दरमाहा मानधन मिळते.तर गटप्रवर्तकाना टी ए डी ए म्हणून मासिक आठ हजार सातशे पंचेविस रुपये मिळतात. अत्यल्प मिळणाऱ्या या मानधनविषयी त्या असंतुष्ट आहेत. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शाशकीय कर्मचार्याचा दर्जा द्यावा अशी क्रुती समितीची मागणी आहे.त्यांची सेवा समाप्त होईपर्यंत तरी अंगणवाडी सेवीकेएवढे तरी मानधन मिळावे अशीही त्यांनी मागणी केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये आशा स्वयंसेवकांना दहा हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते परंतु ते आपल्याकडे फार अत्यल्प असल्याने हे कर्मचारी चिंताग्रस्त आहेत. अनेक आंदोलने ,विशाल मोर्चे ,लोकशाही मार्गाने केलेले आंदोलने व मंत्र्यांना भेटून निवेदने देऊन चर्चा सुधा करण्यात आल्या.केवळ पोकळ आश्वासन बघता या कर्मचायांना दिलासा मिळालेला नाही. 20 आँगस्ट ला आझाद मैदानावर याच मागण्या घेऊन प्रचंड निदर्शनेही केले होते. विधानसभेच्या आदर्श आचार संहिता केव्हाही लागू शकतात त्यामुळे लवकरात लवकर शाशनाने योग्य निर्णय घ्यावा व मानधन वाढीचा आदेश काढावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करत मागण्या पूर्ण न झाल्यास कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.आमदार ऍड. संजय धोटे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गटप्रवर्तक सूलभा पाटील ,अस्मिता वान्ढरे ,भाग्यश्री गिरसावले ,आशासेविका श्रधा पंचभाई , मंदा धूर्वे , वसंता मारपेल्ली , शालू लान्डे , लता चांदेकर, नीकीता नीर आदींसह मोठ्यासंख्येत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ता उपस्थित होते.