अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात अनेक घरांची पडझड

    दिनांक :06-Sep-2019
 
 
 
:- वडसा रोडवरील भुती नाल्यावरुन ओवरफ्लो
:- वाहतुकीची कोंडी
:- अनेक प्रवाशांना राहण्याची व्यवस्था नाही
:- लाडज, बोरगाव या गावाचा तालुक्याशी संर्पक तुटला.
ब्रम्हपुरी,
ब्रम्हपुरी तालुक्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शहरात पाणी पाणी झाले आहे. तालुक्यात सुध्दा अनेक घरांची पडझड झाली असुन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या चम्मु सोबत पाण्याची व पडझड झालेल्या घरांची पाहणी करत आहे. व सर्व तलाठ्यांना तहसीलदार यांनी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. ब्रम्हपुरी - वडसा रोडवरील भुती नाल्यावरुन पाण्याचे ओवरफ्लो झाल्याने हा मार्ग पुर्ण पणे बंद करण्यात आले आहे. मार्ग बंद असल्याने प्रवाशांना चांगली दमछाक होत आहे. प्रवाशी पाणी कमी होण्याची वाट पाहात आहे. पण सध्या तरी पाऊस बंद झालेला नसुन हा मार्ग खुला केव्हा होईल हे सांगता येत नाही. भुती नाल्यावरुन ओवरफ्लो झाल्याने ब्रम्हपुरी पोलीस नाल्यावर बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. पोलीस कोणालाही नाला पार करू देत नसत. अनेक नागरिक झिलबोडीवरुन रेल्वे रोडने येणे जाणे करत आहे. तहसील विभाग व पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.