नागपुरात मोसमातील दमदार पाऊस

    दिनांक :06-Sep-2019
नागपूर,  
देशासह राज्यात सर्वत्र समाधानकारक ते अतिवृष्टीपर्यंतचा पाऊस झाला, परंतु नागपूर मात्र अद्यापही तहानलेलेच होते. दुष्काळ सावरण्यासाठी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांच्याही चिंता वाढल्या होत्या. परंतु आज शहरात पावसाने दमदार हजेरी लावत आतापर्यंतची सर्व कसर भरून काढली. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत वरून राजा शहरात धोधो बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागपूकरांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीलाही याचा फटका बसला. असे असले तरी सरतेशेवटी समाधानकारक पाऊस झाल्याने नागपूरकर मात्र सुखावले आहेत.