वास्तू शास्त्राच्या दृष्टीने गणेश पूजन

    दिनांक :07-Sep-2019
वास्तू नियमांनुसार आपण गणेशाची स्थापना ईशान्य, पश्चिम आणि वास्तूच्या ब्रह्म स्थानी करू शकता. हे शक्य न झाल्यास वास्तूच्या पूर्व ते पश्चिम या उत्तर गोलार्धात कोठे ही करू शकता. वास्तूचा दक्षिण गोलार्ध हा गणेश स्थापनेसाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. गणेशाचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेस होईल अशी व्यवस्था करावी. सर्व प्रथम ज्या ठिकाणी गणेश पूजन करणार आहात तो पसिसर मोठ्या मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यावा म्हणजे त्या ठिकाणी असलेली अशुभ ऊर्जा नाहीशी होवून शुभ ऊर्जेच्या लहरीत वाढ होईल. या नंतर या परिसरातील देशी गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण असणारे मिश्रण िंशपडावे या उपयाने ही त्या परीसरातील शुभ ऊर्जेत वाढ होते. या नंतर त्या जागेत धूप फिरवावा व घंटा नाद करावा व ती जागा गणेश स्थापनेसाठी योग्य बनवावी. 

 
 
वरील प्रमाणे स्थापने साठी योग्य वातावरण झाल्यानंतर ज्या पाटावर किंवा चौरंगावर गणेशाची स्थापना करणार असाल त्या पटावर प्रथम वस्त्र अंथरूण घ्यावे. ईशान्य भागांत निळे, पश्चिम भागांत पांढरे आणि ब्रह्म स्थानी पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरावे. वरील तीन जागा सोडून इतर स्थानी आपण क्रीम किंवा पांढर्‍या रंगाचे वस्त्र वापरू शकता. त्या वस्त्रावार तांदळाचे स्वस्तिक काढावे. गणेश मूर्ती पश्चिम मुखी बसविणार असाल तर मूर्तीच्या उजव्या बाजूस कलश स्थापन करावा. या कळशावर चार हळदीची आणि चार कुंकवाची बोटे ऊटवावीत. ही अष्ट दिशा दर्शक होतात. कळशीमध्ये थोड्या अखंड अक्षदा, पैशाचे नाणे, हळदी- कुंकू टाकावे. त्यानंतर कळशावर आंब्याची पाच पाने असलेली डहाळी ठेवावी व त्यावर श्रीफळ ठेवावे.
 
मूर्तीच्या डाव्या बाजूस निरंजनाची व्यवस्था करावी. या मुळे जल, अग्नी तत्व संतुलीत होते. गणेश मूर्ती पूर्व मुखी ठेवणार असल्यास कलश आणि निरंजन यांची व्यवस्था वर सांगितलेल्या बाजूच्या विरुध्द बाजूस करावी. या नंतर शुभ मुहूर्त बघून गणेश मूर्तीची स्थापना करावी. स्थापना केल्यानंतर प्राण प्रतिष्ठापना करण्यसाठी उजव्या हातात ऐक दूर्वा जुडी घ्यावी ती मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी लावावी आणि ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती करावी व नैवद्य दाखवावा. याच वेळी वास्तूच्या आग्नेय भागात वास्तू पुरुषाला नैवद्य दाखवावा व घरांतील देवांनाही नैवद्य दाखवावा.