बँकेचे साडेचार कोटी रुपये घेऊन जाणारी गाडी सत्याग्रही घाटात पलटी

    दिनांक :07-Sep-2019
वर्धा, 
अ‍ॅक्सिस बँकेची रोख घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात होऊन गाडी जागीच पलटली. ही घटना शुक्रवार सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ नागपूर ते अमरावती दरम्यान सत्याग्रही घाटात घडली. अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने नियंत्रण बिघडून गाडीला अपघात झाल्याचे समोर येत आहे.
 

 
 
वाहन क्रमांक डी एल २ एस ५५८३ असा आहे. ही गाडी रोख रक्कम घेऊन अमरावतीकडून नागपूरला जात होती. यावेळी सत्याग्रही घाटात गाडीचा अपघात घडला. यावेळी वाहनात सुरक्षारक्षकसह चौघे जण होते. साडेचार कोटी रुपयांची रक्कम या गाडीत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कुणीही पैशांना हात लावला नव्हता. यावेळी दुसरे वाहन बोलावून हे पैसे तत्काळ अमरावतीला परत नेण्यात आले.