कारंजा शहरात दोन ठिकाणी तलवारीसह शस्त्रसाठा जप्त

    दिनांक :07-Sep-2019
स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांची कार्यवाही
 
कांरजा लाड,
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वाशीम व कारंजा शहर पोलिस स्टेशन यांच्या वतीने गुप्त माहीतीच्या आधारे वेगवेगळया ठिकाणी केलेल्या हब्बीब नगरातील एकाच्या घरी तर नागनाथ मंदीर जवळ आस्ताना या दोन्ही ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत एकुण तिन तलवारी, दोन गुप्त्या, चार चाकु व पाच लोंखडी पाईप असा शस्त्र साठा जप्त केल्याची कार्यवाही 7 सष्टेंबर रोजी 4 वाजताच्या दरम्यान केली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी गुप्त माहीतीच्या आधारे केलेल्या कार्यवाहीत कारंजातील हब्बीब नगरातील मोहम्मद बिलाला अ कलाम यांच्या घरातून दोन तलवारी, दोन गुप्त्या, चार चाकु व दोन लोंखडी पाईप असा शस्त्र साठा जप्त केला. तर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने केलेल्या दुसर्‍या कार्यवाहीत नागनाथ मंदीराजवळील आस्ताना परीसरातील अजीत शाह अन्नू शाह व शाबीर शाह अजीत शाह यांच्या घरातून एक धारधार तलवार व तिन लोखंडी पाईप असा शस्त्र साठा जप्त करून कार्यवाही केली. या दोन्ही घटनेतील तिन आरोपींना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
 
 
 
स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी केलेल्या कार्यवाहीत एपीआय अतुल मोहनकार, पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलिस कर्मचारी भगवान गावंडे, संजय नंदकुले, अश्‍विन जाधव, किशोर चिंचोळकर, प्रविण राउत, प्रशांत राजगुरू, सुनिल पवार, मुकेश भगत, प्रेमदास आडे, प्रेम राठोड, संतोष चैनकुळे, निलेश इंगळे, महीला पोलिस कर्मचारी तहेनिना शेख, रेशमा ठाकरे व चालक मिलींद गायकवाड व श्याम इंगळे यांनी सहकार्य केले.
कारंजा शहर पोलीसांनी केलेल्या दुसर्‍या कार्यवाहीत ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कायंदे, धनराज पवार, सुरज खडसे, अमोल कानडे, रूपेश मस्के, शुभांगी नाईक यांनी सहकार्य केले.