मानवी हक्क अभियान वतीने धरणे आंदोलन

    दिनांक :07-Sep-2019
मंगरुळनाथ,
येथील तहसील कार्यालयासमोर 7 सप्टेंबर रोजी गायरान जमिनिधारकाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार पेरलेल्या जमिनीचा पंचनामा करून नोंद करणे याशिवाय गायरान जमिनीचा मालकी हक्क मिळावा. सन 1990 पूर्वीपासून ई क्लास जमिनी वहिती करून पिके घेतली जात असली तरी अद्यापपर्यंत आमच्या नावाने मालकी हक्क मिळाला नाही. 
 

 
 
हा मालकी हक्क प्रत्येक गायरान धारकांना मिळवा. गायरान धारक हा मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. अल्पशा मजुरीवर मुलांचा शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण जाते. गायरान जमिनीचा मालकी हक्क मिळावा व अतिक्रमण जागेचा घरकूलासाठी 8 अ नोंद करण्यात यावी . अशा विविध मागण्या निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, रोहिणी खंडारे, दयाराम इंगोले, लता कांबळे, कैलास पंडित, वसंता मोरे, दुर्गा सावळे आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.