नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक

    दिनांक :07-Sep-2019
राखी सावंत तिच्या अतरंगी कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती सतत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. लग्नापासून ते हनीमूनपर्यंत असा सगळ्या गोष्टींवर ती सोशल मीडियावर बिनधास्तपणे शेअर करायची. मात्र तिने लग्न केलेला व्यक्ती कोण होता याविषयी राखीने कोणालाच काही कळु दिले नाही. आश्चर्याची गोष्ट ही आहे की राखीच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहिती नाही. मात्र शेवटी राखीचे कारनामे सा-या जगाला माहिती असल्यामुळे तिचे फारसे कोणीही तसे मनावर घेत नाही. मात्र नको त्या गोष्टी करत पब्लिसिटी मिळणारी ड्रामा क्वीन राखीला मात्र एक चांगली संधी मिळाली आहे.
 
 
 
, होय, लवकरच 'बिग बॉसचा 13' वा सिझन सुरू होणार आहे. यावेळी ओपनिंग शोलाच राखी या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी ती ‘छप्पन छुरी’ या तिच्या आयटम साँगचे प्रमोशन करण्यासाठी या मंचावर हजेरी लावणार आहे. सलमान समोर आयटम साँग्स करणार या गोष्टीमुळे ती आज मै उपर आसमाँ निचे अशीच तिचा अवस्था झाली आहे. बिग बॉसच्या मंचावर राखी पुन्हा एकदा आग लावणार म्हटल्यावर तिच्या या गाण्यालाही जोरदार पल्बिसिटी मिळणार हे मात्र नक्की. आणि त्यामुळे राखीचे गाडी पुन्हा एकदा रूळावर येणार असेच काहीसे चित्र दिसतंय.