जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

    दिनांक :07-Sep-2019

चंद्रपूर,
ज्या समाजातील शिक्षक आपली भूमिका चोख बजावतात तो समाज व ते राष्ट्र कधीही अधोगतीला जात नाही या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उक्तीनुसार त्यांच्याच जयंती दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारे ५ सप्टेंबर ला कन्नमवार सभागृहात जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक तथा राष्ट्रिय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या सोळा शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक हा समाजाचा कणा आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. असे याप्रसंगी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी गुरूमहिमा व शिक्षकांचे समाजातील मानाचे स्थान यावर आपले मनोगत व्यक्त केले. जि.प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे यांनी पुरस्कार देण्यामागील हेतू व जि.प. शाळांची मागील चार वर्षांपासून ची प्रगती यावर आपले मनोगत व्यक्त केले. ब्रिजभूषणजी पाझारे यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका काय असावी हे स्पष्ट केले. संतोषजी तंगडपल्लीवार यांनी देखील जि.प.शाळांचे प्रगतीरूप बदलते स्वरूप यावर भाष्य केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक  दिपेंद्र लोखंडे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन बंड मॅडम यांनी केले. याप्रसंगी कोरपना पं.स.तील वरगंटीवार, ब्रह्मपुरीतील मरारमेंढा शाळेचे एन.सी.ठक्कर ,सिंदेवाहीतील ब्राह्मणकर , राजूरा पानघाटे,जिवती राठोड, बल्लारपूर शेख ,वरोरा विधाते,गोंडपिपरी बाबनवाडे,पोंभुर्णा जुमनाके ,चिमूर लोखंडे,भद्रावती खिरटकर मॅडम,सावली राऊत, मुल मांदाडे, चंद्रपूर देशपांडे व माध्यमिक शिक्षक राजुरा बुटले यांना शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सपत्निक गौरविण्यात आले.