कारंजामध्ये वाहतूक कोंडीची भीषण समस्या

    दिनांक :08-Sep-2019
पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
कारंजा लाड,
कारंजा शहरात वाहतूक व्यवस्था बेशिस्त झाली आहे. वाहतूक व्यवस्थेकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहरांमध्ये अनेक शाळा रस्त्याच्या लगत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पायी चालणार्‍या व्यक्तीला कसे चालावे हे समजत नाही. तसेच  \कर्कश हॉर्न व बेशिस्त ड्रायव्हिंग त्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. शहरांमध्ये ऑटोची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. ऑटोचालक आपला ऑटो कोठेही थांबवितात परंतु वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहे.  या सर्व प्रकारावर पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून बेशिस्त वाहतुकीवर लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.